चंदगड तालुक्यात पावसाचा जोर वाढला,फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2021

चंदगड तालुक्यात पावसाचा जोर वाढला,फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो


 घटप्रभा नदीवरील फाटकवाडी (घटप्रभा) मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो.

चंदगड / प्रतिनिधी

     चंदगड तालुक्यात गेल्या दोन - तीन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे.तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा नदीच्या पाण्याची पातळी वाढ झाली आहे. रात्रभर पावसाने जोर केल्यास दोन्ही नदीच्या पात्रातील पाणी बाहेर पडून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील एकूण २३ प्रकल्पांपैकी फाटकवाडी (घटप्रभा) मध्यम प्रकल्प  रात्री दोन वाजता ओव्हरफ्लो झााले . आज  बुुधवार सकाळी पर्यंत च्या २४ तासात तालुक्यात सरासरी ७०.८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . तालुक्यातील तीन मध्यम व २० लघुपाटबंधारे प्रकल्पांत ५४.५५ टक्के साठा झाला असून पाणीपातळीत वेगाने वाढ सुरू आहे.  .तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर पावसाचा जोरही वाढत आहे. मंगळवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस , कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे . चंदगड ९ ०, नागणवाडी ६७, माणगाव ३४ , कोवाड ३८  तुर्केवाडी  ८४, हेरे ११२,  हा पाऊस शिवारातील सर्वच पिकांना पोषक ठरत असला तरी वाऱ्यामुळे ऊस पीके भुईसपाट होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मसळधार पावसाने शिवारात पाणी साचल्याने तरुण वर्ग खेकडे पकडण्यासाठी शिवारात गर्दी करत आहेत. 

No comments:

Post a Comment