![]() |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड - बेळगाव रोडवर नागनवाडी फाटा येथे पोलिस यंत्रणा तैनात आहे. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पोलिसांनी कडक धोरण अंमलात आणण्यासाठी यंत्रणा सतर्क केली असल्याचे दिसून येत आहे. चंदगड तालुक्यातील पोलीस यंत्रणा ही कमालीची सतर्क झाली आहे.
जिल्ह्यातील लाॅकडाऊन काळात ही कोरोनाचे रुग्ण वाढवल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हा प्रशासनाला कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे चंदगड तालुक्यात ही याची अंमलबजावणी त्वरित सुरू करण्यात आली आहे.
चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील चंदगड, नागनवाडी फाटा, पाटणे फाटा, शिनोळी, कोवाड या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. येथे ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी व चौकशी केली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना मज्जाव केला जात आहे. नागरिकांनी अगदीच अत्यावश्यक काम असेल तरच निर्धारित वेळेत बाहेर पडावे. विनाकारण बाहेर पडू नये. कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक तळेकर यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.
No comments:
Post a Comment