चंदगड येथील रविकांत मांगले यांची चटका लावणारी एक्झिट - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2021

चंदगड येथील रविकांत मांगले यांची चटका लावणारी एक्झिट

कै. रविकांत मांगले
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथील रविकांत नामदेव मांगले यांचे दि. 23 मे रोजी दुःखद निधन झाले. नेहमीच सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. प्रत्येक वर्षी गडकोट मोहिमांमध्ये त्यांचा कायम पुढाकार असायचा. २०१९-२० साली आलेल्या महापुरामध्ये पुरग्रस्तांना मदत करण्यात ते नेहमी अग्रेसर होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. चंदगड येथील मांगले ज्वेलर्सचे ते मालक होत.

No comments:

Post a Comment