अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगडच्या वतीने स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर कोव्हीड विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2021

अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगडच्या वतीने स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर कोव्हीड विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा

अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगडच्या वतीने स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर कोव्हीड विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.

चंदगड / प्रतिनिधी

         कोरोना महामारी मुळे संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगडच्या वतीने लोकनेते स्वर्गीय नामदार बाबासाहेब कुपेकर कोव्हीड  विलगीकरण कक्ष लोकार्पण सोहळा कोरोना बाबतीतचे सर्व नियम पाळून संपन्न झाला. या विलगकरण कक्षात २५ बेड उपलब्ध आहेत. यापुढील काळात एकूण ५० बेडचे  नियोजन केले जाणार आहे. विरंगुळा कक्ष, चहा नाश्ता, जेवणासह या ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

           यावेळी प्रातांधिकारी विजया पांगारकर, नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर, शिवसेना जिल्हा संघटक संग्रामसिंह कुपेकर यांच्या शुभहस्ते फित कापून कोवीड सेंटर रूग्ण सेवेसाठी खुलं करण्यात आले. या कार्यक्रमासाठी  तहसीलदार विनोद रणवरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत जगताप, पंचायत समिती सभापती अनंत कांबळे, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, तालुका आरोग्याधिकारी डॉ. आर. के. खोत,  जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, उद्योजक तथा कोरोना योद्धा डाॅ. सुनिल काणेकर, माजी जि. प. सदस्य राजेंद्र परीट, नगरसेवक मेहताब नाईक, नगरसेवक आनंदा हळदणकर,  उर्दु हायस्कूलचे सेक्रेटरी दस्तगीर आगा, कलीम मदार, प्रमोद कांबळे, मुस्लिम समाज अध्यक्ष श्री. मुल्ला, राष्ट्रवादी महिला चिटणीस सौ. प्रमीला पाटील, अशोक  दाणी,  तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी, समाजसेवी, नगरसेविका व इतर मान्यवर उपस्थित होते. 

        अलताफ मदार, सल्लाऊद्दीन नाईकवाडी, शब्बीर बेपारी, अल्लाउद्दीन सय्यद, नियाज मदार, मोहसीन पटेकरी, आरीफ खेडेकर, खलील अहमद अल्लाखान, सलीम नाईकवाडी व इतर मान्यवर संचालक उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष तजमुल फणीबंद यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment