चंदगड येथील कोरोना सेंटरमध्ये युवकांकडून अन्नदान कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2021

चंदगड येथील कोरोना सेंटरमध्ये युवकांकडून अन्नदान कार्यक्रम

चंदगड येथील कोरोना सेंटरमध्ये युवकांकडून अन्नदान करण्यात आले.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     स्ट्रॉंग टी ग्रुप चंदगड-बेळगाव, डॉ एन टी मुरकुटे फौंडेशन ,सेजल कॉम्प्लेक्स व्यापारी संघटना पाटणे फाटा ह्यांच्या सयूंक्त विद्यमानाने चंदगड येथील कोरोणा सेंटरमध्ये युवकांकडून अन्नदान करण्यात आले. 

     शनिवार दिनांक 28 मे 2021 रोजी चंदगड येते कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोविड सेंटर मध्ये जाऊन एक वेळचे जेवण देण्यात आले. या उपक्रमासाठी बऱ्याच थोरामोठयाचं सहकार्य लाभल. उपक्रमावेळी डॉ. निवृत्ती गुरव, डॉ. रवी पाटील, डॉ. प्रशांत कदम, डॉ. विजय कट्टेमनी, डॉ. एन. टी. मुरकुटे, सोपान चव्हाण, प्रमोद पाटील, बादशहा शेख, मुर्थी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment