चंदगड पोलिस ठाण्याच्या वतीने `मिशन संवेदना` अंतर्गत मंगळवारी रक्तदान शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2021

चंदगड पोलिस ठाण्याच्या वतीने `मिशन संवेदना` अंतर्गत मंगळवारी रक्तदान शिबीराचे आयोजन


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड येथील पोलिस ठाण्याच्या वतीने `मिशन संवेदना` अंतर्गत मंगळवार दि. २९ जून २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. याबाबतची माहीती चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश होडगर यांनी दिली. 

राज्यासह देशावर कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. याचा सामना करताना रक्ताची गरज भासत आहे. त्यामुळे या कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना याचा लाभ व्हावा. कोरोनाशी दोन हात करताना रक्ताचा तुटवडा जाणवू नये. यासाठी चंदगड पोलिस ठाण्याच्या वतीने मिशन संवेदना अंतर्गत या रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. इंगळे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. चंदगड तालुक्यातील नागरिकांनी स्व-खुशीने सदर मिशन संवेदना अंतर्गत रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन चंदगड पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. 
No comments:

Post a Comment