शिनोळी येथील ॲक्वा अलॉईज् कंपनीकडून कोवाड आरोग्य केंद्राला आरोग्य साहित्याची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2021

शिनोळी येथील ॲक्वा अलॉईज् कंपनीकडून कोवाड आरोग्य केंद्राला आरोग्य साहित्याची भेट

कोवाड : विविध साहित्य भेट देताना जी. एम. बेनके, प्रसाद फाटक, चंद्रकांत तुपारे आदी.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      शिनोळी येथील ॲक्वा अलॉईज् कंपनीच्या सामाजिक उपक्रम फंडातून कोवाड येथील आरोग्य केंद्राला कोरोना काळातील अत्यावश्यक आरोग्य साधनांचे वाटप करण्यात आले. यामध्ये थर्मल गन, हॅन्डग्लोज, ऑक्सीमीटर, हॅन्ड सनीटायझर, बीपी ऑपरेटर मशीन आदी साहित्याचा समावेश होता. आरोग्य साधनांची कमतरता भासत होती, याबाबत आरोग्य केंद्रकडून ॲक्वा अलॉईज् कंपनीच्या सामाजिक उपक्रम कमिटीकडे मदत मिळावी,  याकरिता मागणी करण्यात आली होती. कंपनीच्या सीएसआर कमिटीकडून याला मंजुरी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत गुरुवार दिनांक 21 रोजी आरोग्य केंद्र, कोवाड यांना भेट देऊन कंपनीचे व्यवस्थापकीय विभागातील जी. एम. बेनके, प्रसाद फाटक आणि चंद्रकांत तुपारे यांच्या हस्ते आरोग्य साधने वितरीत करण्यात आली. यावेळी ॲक्वा अलॉईज् कंपनीचे व्यवस्थापकीय विभागामार्फत जी. एम. बेनके यांनी, यापुढे देखील असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. तसेच कमिटीचे मार्गदर्शक एमडी अमृतराव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम यशस्वी केल्याचे सांगितले.  डॉ. प्रसन्न चौगुले यांनी मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

No comments:

Post a Comment