कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची अडकूरला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2021

कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची अडकूरला भेट

 

अडकूर येथे जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देवून मार्गदर्शन केले.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          कोल्हापूर जिल्हा पोलिस  जिल्हा अधीक्षक  शैलेश बलकवडे यांनी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडकूर  (ता. चंदगड) येथे  भेट दिली.

       यावेळी  पोलिस अधिक्षक श्री. बलकवडे यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाय योजना सुचवल्या. अडकूर कोरोना हॉट-स्पॉट गाव बनले आहे. कोरोणाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच  चंदगड तालुका लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्यात एक नंबर असल्याचे त्यांनी ह्या प्रसंगी सांगुन सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले.

         यावेळी प्रसंगी चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर, अडकुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, अडकुर गावचे कोरोणा कमिटी सदस्य, ग्रामसेवक श्री. सोनार, सरपंच यशोधा कांबळे उपस्थित होत्या.

1 comment:

Post a Comment