महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात लवकरच २र२६ पदे भरणार - राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2021

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात लवकरच २र२६ पदे भरणार - राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची माहीती
ऑनलाईन मिडीया - न्युज डेस्ट

          महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागात लवकरच १६ हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली होती. आता आरोग्य मंत्रालयाने त्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं असून २,२२६ पदांच्या निर्मितीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता ८१२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ११८४ कुशल मनुष्यबळ सेवा, २२६ अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण २,२२६ पदे उपलब्ध करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

         सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या आदेशात असं सांगण्यात आलं आहे की, या २,२२६ पदांपैकी काही पदे नियमित, तर काही कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट यासाठी ही पदे निर्माण केली आहेत. आता केवळ पदनिर्मितीचे आदेश जारी करण्यात आले असून त्याच्या भरतीच्या प्रक्रियेची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

         राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या जाहिरातीत आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, स्त्री आणि पुरुष परिचालक, लिपिक, कक्ष सेवक, शिपाई, वाहन चालक, सफाई कामगार आदी पदांसाठी निर्मिती करण्यात आली आहे.

          राज्यात आरोग्य विभागात १६ हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली होती. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील १२ हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे.No comments:

Post a Comment