सरोळी ग्रामस्थांकडून गडहिंग्लज व कोल्हापूर स्मशानभूमिसाठी लाकडे, शेणी दान - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2021

सरोळी ग्रामस्थांकडून गडहिंग्लज व कोल्हापूर स्मशानभूमिसाठी लाकडे, शेणी दान

सरोळी ग्रामस्थांच्या वतीने कोल्हापूर व गडहिंग्लज स्मशानभूमीला शेणी व लाकडे पाठवताना सरपंच मारूती पाटील.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       सरोळी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थानी मिळून गडहिंग्लज व कोल्हापूर येथील स्मशानभूमिला जळावू लाकडे आणि शेणी दान केली.

      कोरोनाच्या या लाटेत कोल्हापूर जिल्हा पुरता हादरून गेला .जिल्हयातील मृत्यूची संख्या तर रोज ६० पर्यंत पोहचली होती . स्मशानातील जागा अपूरी पडू लागली . यातच या प्रेतांच्या जळणासाठी लागणारी लाकडे व शेण्याही मिळेणास्या झाल्या . त्यामूळे कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारला अडचणी येऊ लागल्या . गडहिंग्लजलाही अशीच अवस्था निर्माण झाल्याने अडचण निर्माण झाली . याचा विचार करून सरोळी ग्रामपंचायतीचे सरपंच मारूती पाटील यानी ग्रामस्थांना लाकूड व शेणी दान करण्याचे आवाहन केले . याला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत दोन टेम्पो लाकूड व शेणी दान केल्या .आज या शेणी व लाकडे गडहिंग्लज व कोल्हापूर येथील स्मशानभूमिकडे पाठविण्यात आल्या . यावेळी उपसरपंच प्रभाकर पाटील , सदस्य संजय पाटील , शंकर शिट्याळकर, प्रकाश जांबोकर . आशिष आंबिटकर . उत्तम कांबळे , संभाजी कांबळे , लक्ष्मण आंबिटकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते .सरोळी ग्रामस्थांच्या या दानशूरतेचे सर्वत्र कौतुक होत आहे .

No comments:

Post a Comment