३० जूननंतर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु करणार! ना. हसन मुश्रीफ, शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले आश्वासन - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2021

३० जूननंतर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु करणार! ना. हसन मुश्रीफ, शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले आश्वासन

ना. मुश्रीफ यांना शिक्षकांच्या बदली बाबत निवेदन देताना राजाराम वरुटे व संघटना पदाधिकारी.

ऑनलाईन मिडीया

       जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ३० जून नंतर सुरू करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिली. 

         महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष  राजाराम वरुटे यांनी शिष्टमंडळासह नाम मुश्रीफ यांची कागल येथे भेट घेतली यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

         यात प्रामुख्याने जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पोर्टल सुरु करावे. त्यापूर्वी बदलीसाठी ३१ मे ऐवजी ३० जून ही तारीख ग्राह्य धरावी. संवर्ग चार साठी ३ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना विनंती बदलीसाठी पात्र समजणेत यावे. अशा आशयाचे शुद्धी पत्रक काढणेत यावे. अशी विनंती करणारे निवेदन यावेळी देण्यात आले.

           यावेळी ना. मुश्रीफ यांनी सध्या बदलीचे सॉफ्टवेअर तयार झाले आहे. शासनाचे ३० जून पर्यंत बदल्या करु नयेत असे पत्र असलेने ३० जून नंतर बदली पोर्टल सुरु करणेत येईल व दिवाळी पूर्वी  नवीन बदली जी.आर. प्रमाणे दोन्ही बदली प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. ३० जून व ३ वर्षे सेवा पूर्ण विनंती बदली  शुद्धीपत्रकाबाबत सचिवांशी व वरिष्ठ अधिकार्‍याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे सांगितले. शिष्टमंडळात शिक्षक बँक चेअरमन प्रशांत पोतदार, माजी चेअरमन जी.एस. पाटील, बाजीराव कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment