आंबेवाडी येथील सरस्वती डुरे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2021

आंबेवाडी येथील सरस्वती डुरे यांचे निधन

सरस्वती मष्णू डुरे


 चंदगड / प्रतिनिधी

आंबेवाडी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती सरस्वती मष्णू डुरे (वय वर्षे ८३) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. मुख्याध्यापिका सौ वैजयंता शिंदे, शिक्षक आप्पाजी डुरे, गोपाळ डुरे, माजी सरपंच अमृत डुरे यांच्या त्या मातोश्री तर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख  शंकर शिंदे यांच्या सासुबाई होत. सरस्वती डुरे या  स्वता अशिक्षित असूनही आपल्या पाचही मुलाना प्रतिकूल परिस्थितीमध्ये  उच्चशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी घेतलेले कष्ट समाजाला आदर्शवत आहेत.   No comments:

Post a Comment