चंदगड तालुक्यतील दिव्यांगांना शासनाने त्वरीत लस उपलब्ध करुन देण्याची संघटनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2021

चंदगड तालुक्यतील दिव्यांगांना शासनाने त्वरीत लस उपलब्ध करुन देण्याची संघटनेची मागणी

चंदगड / प्रतिनिधी

   कोरोनाचे संकट आजही कायम आहे. त्यामुळे शासनाने या दुर्बल घटकाचा प्राधान्याने विचार करुन अपंगाना लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी चंदगड तालुका दिव्यांग संघटनेच्या वतीने केली आहे.        चंदगडचे तहसीलदार यांनी संबंधित अधिकारी डॉक्टर यांना आपल्या कार्यालयाकडून आदेश देण्यात यावेत कि, तालुक्यातील १२०० अपंग, विधवा, परितक्तया, निराधार, शेतमजूर, भुमीहिन लोक कोविड प्रतिबंधक लसी पासुन वंचित आहेत. अशा लोकांच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी लस उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे. अशी मागणी दिव्यांग संघटनेच्या वतीने चंदगड तालुकाध्यक्ष जोतिबा गोरल यांनी केली आहे. 
No comments:

Post a Comment