हिंडगाव येथे तीन लाखांची दारू जप्त, दोघेजण ताब्यात, तालुक्यातील एकाचा समावेश - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2021

हिंडगाव येथे तीन लाखांची दारू जप्त, दोघेजण ताब्यात, तालुक्यातील एकाचा समावेश

चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा

         हिंडगाव (ता. चंदगड) येथे काल रात्री चंदगड पोलीसांनी गोवा बनावटीची  ३ लाख १३ हजार २१४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुरेश बाबाजी गावडे (रा. खासकीरवाडा, सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग) व दशरथ अर्जुन सावंत (रा. गवसे, ता. चंदगड, जि कोल्हापूर) यांना चंदगड पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

         याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी कि, सुरेश गावडे हा सावंतवाडीतून हिंडगाव मार्गे गोवा बनावटीची दारू वहातूक करणार असल्याची माहिती चंदगड पोलीसांनी खबऱ्या करवी मिळाली. त्यानुसार चंदगड पोलीसांनी येथे सापळा रचला. याचवेळी हिंडगाव गावात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपरच्या आडोशाला एक मारुती ओमणी गाडी (नं एम.एच ०७ ए बी. २०२७) ही गाडी आली. गाडीची तपासणी केली असता गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे २९ बॉक्स मिळून आले. त्यामध्ये एकूण एक लाख २९,०२४ रुपयाची दारू व १,५०,००० मारुती ओमीनी असा एकूण ३१३२२४/- रुपये किंमतीचा प्रोव्ही गुन्ह्याचा मुद्देमाल महाराष्ट्र राज्याचा कर चुकून त्याची विक्री करण्याकरिता वाहतूक करत असताना सुरेश बाबाजी गावडे, दशरथ अर्जुन सावंत या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस निरीक्षक  सतिश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कान्स्टेबल  रोहिदास नांगरे,  वैभव गवळी, दिगंबर गुरव यांनी केली आहे. अधिक तपास पो.ना. महापूर करत आहेत.



No comments:

Post a Comment