सोमवारी महाराष्ट्रातील शाळांची घंटा घनघनणार, पण विद्यार्थ्यांविना, केवळ शिक्षक उपस्थित राहणार - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2021

सोमवारी महाराष्ट्रातील शाळांची घंटा घनघनणार, पण विद्यार्थ्यांविना, केवळ शिक्षक उपस्थित राहणार


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           जून महिना आला की चाहूल लागते  शाळा सुरू होण्याची, दरवर्षी १४ जून किंवा १५ जून शाळा सुरू होण्याची तारीख ठरलेली असते . पण सलग दुसऱ्या वर्षा महाराष्ट्रातील शाळांची घंटा घनघनणार , पण विद्यार्थ्यांविना, केवळ शिक्षक उपस्थित राहणार आहेत. याला एकच कारण कोविड १९.

         शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे शिक्षक स्वागत करत असतात. त्यांना विविध गिफ्ट, भोजन देऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी विविध खेळ, स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शाळेची आवड निर्माण होते. त्यालाच शाळा प्रवेश उत्सव असे म्हटले जाते. परंतु मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शाळा प्रवेशोत्सव हा आ ऑनलाईनच साजरा करायचा आदेश शासनाने दिला आहे. त्याचबरोबर  शाळेच्या पहिल्याच दिवशी झूम मीटिंग द्वारे किंवा गुगल मिट द्वारे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन स्वागत करण्यात येणार आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती बैठक, शालेय सच्छता कामकाज, दखलपात्र विद्यार्थी १०० % पटनोंदणी, ऑनलाईंन प्रवेश प्रक्रिया करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातील शाळा विद्यार्थी विना चालू होणार आहेत.

No comments:

Post a Comment