अध्यापक प्रशांत मगदूम यांना राज्यस्तरीय तंत्रस्नेही पुरस्कार प्राप्त, संपूर्ण तालुका तंत्रस्नेही बनवण्याचे स्वप्न - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2021

अध्यापक प्रशांत मगदूम यांना राज्यस्तरीय तंत्रस्नेही पुरस्कार प्राप्त, संपूर्ण तालुका तंत्रस्नेही बनवण्याचे स्वप्न

 

प्रशांत मगदूम

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

 ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या उक्तीनुसार एक एक तंत्रस्नेही जोडत जाऊन संपूर्ण चंदगड तालुकाच तंत्रस्नेही बनवण्याचे स्वप्न एका तंत्रस्नेही अध्यापकाने उराशी बाळगले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग कार्यरत आहे. आपल्या शिक्षण विभागातील प्रत्येक शिक्षक बंधू तंत्रस्नेही बनला पाहिजे यासाठी धडपडणारे ते तंत्रस्नेही अध्यापक प्रशांत मगदूम हे असून त्यांनी डीजीटल क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मगदूम हे सध्या बागिलगे- डुक्करवाडी हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नुकताच राज्यस्तरीय तंत्रस्नेही पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कोरोनाच्या काळात गेली दिड वर्ष मगदूम यांनी इंग्रजी व इतिहास विषयाचे ५०० हून अधिक व्हिडीओ बनविले आहेत. सध्या ते इंग्रजी विषयाचे लाईव्ह तास घेत हजारो विद्यार्थ्याना मोफत मार्गदर्शन करीत आहेत.

मगदूम यांच्या या स्वप्नपूर्तीला मराठी अध्यापक संघाने प्रोत्साहन दिले असून त्यांचा पाठीशी राहून या उपक्रमासाठी चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष एम.एन. शिवणगेकर, उपाध्यक्ष बी.एन. पाटील, सचिव एस.पी. पाटील, खजिनदार व्ही.एल. सुतार, तसेच एच.आर. पाऊसकर, फिरोज मुल्ला, संजय साबळे, रवि पाटील यांनी मगदूम त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment