'संत गजानन' पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2021

'संत गजानन' पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू

पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश प्रक्रिया विषयी माहिती देताना प्राचार्य डॉ. संजय दाभोळे व इतर विभागप्रमुख.

महागाव / सी. एल. वृत्तसेवा

     महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२१ - २२ साठी प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी  कुठल्याही प्रकारची पात्रता परीक्षा असणार नाही ही बाब विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक असून प्रवेशासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणी विद्यार्थी करू शकतात.अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यानी दिली.

        या नोंदणीसाठी दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक नोंदणी केल्यावर निकालानंतर विद्यार्थ्यांचे गुण नोंदणी करता येणार आहे.नवीन इंडस्ट्रीच्या उद्योगांच्या गरजांच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ पासून  कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हील इंजिनिअरींग या अभ्यासक्रमा शिवाय मेकॅट्रॉनिक्‍स इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व मागील वर्षी पासुन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असे कौशल्य व ज्ञान  शाखांचे अभ्यासक्रम सुरु केला आहे. 

          यावेळी इतर शाखेबद्दल अधिक माहिती  देण्यात आली. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर अभ्यासक्रमाद्वारे सक्षम इलेक्ट्रॉनिक्स मूलतत्वा बरोबरच  स्मार्ट सिस्टम तयार करण्यासाठी एक्स्पोजन मिळते .ज्यात सेन्सर , प्रोसेसर ,ॲक्चुएटर्स,कम्युनिकेशन नेटवर्क, आय .बो .टी , डेटा सायन्स, डेटा ॲना लेटीक्स व जटिल सॉफ्टवेअर डिझाईन इत्यादीचा समावेश आहे .यामुळे डेटा विश्लेषण, अल्बोरिदम विकास आणि विश्लेषणात्मक कठीण समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष मदत होणार आहे .

           तसेच मेकॅट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंग ही इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, संगणक व निमंत्रण प्रणाली इंजीनियरिंग आयोजन करते यामध्ये मेकॅनिकल च्या मुख्य विषयासह थर्मोडायनामिक्स,हीट ट्रान्सफर, डिजिटल इंटिग्रेटेड सर्किट्स, मशीन ऑफ थेअरी, रोबोटिक्स सिस्टम, सिग्नल प्रोसेसिंग, हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक सिस्टम इ. विषयांचे संक्रमित संयोजन असेल .

           तसेच कोव्हीड महामारीच्या प्रादुर्भावामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मंजूर तीन वर्ष कालावधीचा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम वैद्यकीय अभियांत्रिकी मध्ये विशेष रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . जागतिक स्तरावर पॅरामेडिकल अभियंत्यांची प्रचंड आवश्यकता आहे शिवाय सदर कोर्स हा आमच्या संत गजानन महाराज हॉस्पिटल एन. ए. बी. एच मानांकित २०० बेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संलग्न असल्याने येथील अधिक  सरावामुळे हे विद्यार्थी कुशल बनून करियर प्रदान करण्याबाबत आपली स्वतंत्र लॅब सुरु करुन रुग्णसेवा करू शकतात. भविष्यात अशा नाविन्यपूर्ण अभियंत्याना संरक्षण अनुपयोग, वैमानिक, वाहन,आरोग्य सेवा, कृषी अनुपयोग आणि वैज्ञानिक समुदायापासून मोठ्या संख्येने बनवलेल्या उद्योगांमध्ये डिझाईन कौशल्य इंजीनियर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. दाभोळे यांनी दिली. 

         प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती कॉलेजमध्ये देण्यात येते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संत गजानन पॉलिटेक्निक नेहमीच प्रयत्नशील असते. तरी विद्यार्थ्यांनी सदर प्रवेश प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पॉलिटेक्निकशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment