दहा हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त, एकावर गुन्हा दाखल, कोठे घडली घटना - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2021

दहा हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त, एकावर गुन्हा दाखल, कोठे घडली घटना

 


चंदगड / प्रतिनिधी  

     माणगाव (ता. चंदगड) येथे घराजवळ लपवून ठेवलेली १०हजार ७२० रुपयाची गोवा बनावटीची दारू  चंदगड पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. याप्रकरणी लक्ष्मण वैजू समेमारे (रा.माणगाव ता. चंदगड) याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 लक्ष्मण  समेमारे याने स्वतःचे फायद्याकरीता बेकायदा बिगर परवाना बेकायदा गोवा बनावटीचा प्रोव्ही गुन्हयाचा १० हजार ७२० रुपये किंमतीचा मुद्देमाल महाराष्ट्र राज्याचा कर चुकवुन बेकायदेशीररित्या विक्रीकरिता साठवला होता.या प्रकणी लक्ष्मण ससेमारी याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोना जाधव व पोना किल्लेदार  करत आहेत.
No comments:

Post a Comment