![]() |
मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थाळी ग्रामस्थांनी केलेली गर्दी |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
ढोलगरवाडी व घुल्लेवाडी (ता. चंदगड) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून एक युवक व एक महिला वाहून गेली होती. या दोघांचाही दोन दिवस शोध लागू न शकल्याने चिंता वाढली होती. पण आज तिसऱ्या दिवशी या दोघांचेही मृतदेह सापडल्याने शोध मोहीम संपली. या शोध मोहिमेत ग्रामस्थासह चंदगडच्या आपदा टिमने विशेष परश्रम घेतले.
तर घुल्लेवाडी येथे ओढयाला आलेल्या पुराच्या पाण्यातून सुनिता पांडूरंग कंग्राळकर ही तळगुळीची महिला वाहून गेली होती. तीचाही दोन दिवस शोध लागला नव्हता. यामुळे कुंटूंबियासह प्रशासन चिंताग्रस्थ बनले आहे. त्यातच ताम्रपर्णीला महापूर आल्याने शोधमोहिमेत अडथळे निर्माण झाले होते. पण घुल्लेवाडी त्याच ओढ्यात झाडात अडकलेला सुनिताचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सुद्धा कोवाड पोलीसानी पंचनामा वैद्यकिय तपासणी करीता चंदगडला पाठविण्यात आला आहे. या दोन्ही घटनेचा तपास पो. हे. काँ. कुशाल शिंदे व अमर सायेकर करत आहेत.
No comments:
Post a Comment