'त्या' दोघांनी ओढ्यात वाहून जाणाऱ्या एका तरुणाला वाचवले, कोणत्या गावचे आहेत ते दोघे बहाद्दर, वाचा ...... - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2021

'त्या' दोघांनी ओढ्यात वाहून जाणाऱ्या एका तरुणाला वाचवले, कोणत्या गावचे आहेत ते दोघे बहाद्दर, वाचा ......

पुराच्या पाण्यातून वाचवितानाचा प्रसंग.


कागणी :  सी. एल. वृत्तसेवा / एस. एल. तारिहाळकर 

      कडलगे खुर्द व ढोलगरवाडी (ता. चंदगड) दरम्यान असलेला ओढा ओलांडताना नागरदळे येथील अभिषेक संभाजी पाटील (वय - २८) हा युवक पाण्यातून वाहून गेला. त्याच्यासोबत अभिषेकचा मित्र शशिकांतही वाहून जात असताना माडवळे येथील दोन युवकांनी दाखवलेल्या धाडसामुळे एकाला जीवदान मिळाले.

परशराम मसुरकर                                        अनिकेत पाटील

       परशराम पुंडलिक मसुरकर व अनिकेत गंगाराम पाटील अशी त्या तरुणाला वाचवलेल्या युवकांची नावे आहेत. हे दोघेजण २२ जुलै रोजी सायंकाळी कडलगे बुद्रुकला जात होते. मात्र ओढ्यात पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेण्यासाठी चालत काही अंतर गेले. याचवेळी अभिषेक व शशिकांत हे नागरदळेला जाण्यासाठी ओढ्यातून दुचाकी चालवत जात होते. ते निम्या अंतरावर गेल्यानंतर त्यांची दुचाकी बंद पडली. यावेळी चालक अभिषेक दुचाकीवरून खाली पडल्याने तो वाहून जाणार इतक्यात परशराम याने जीवाची पर्वा न करता एका हाताने दुचाकी ओढून धरली. यावेळी त्याने अभिषेक याला गाडीचा हात न सोडण्याचा सल्ला दिला. मात्र घाबरून त्याने हात सोडल्याने तो वाहून गेला. यावेळी अभिषेक सोबत असलेला दुसरा तरुणही वाहून जात असताना परशराम व अनिकेत यांनी त्याला पकडून बाहेर काढले. दोघे तरुण पाण्यात अडकले असताना माडवळेच्या दोन युवकांमुळे एका तरुणाचा जीव वाचला. त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.No comments:

Post a Comment