कालकुंद्रीतील स्मशान शेडची दुरावस्था, बिडाच्या दाहिनी गंजून निकामी! दुरुस्तीची ग्रामस्थांकडून मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2021

कालकुंद्रीतील स्मशान शेडची दुरावस्था, बिडाच्या दाहिनी गंजून निकामी! दुरुस्तीची ग्रामस्थांकडून मागणी

कालकुंद्री येथील दुरवस्था झालेले स्मशान शेड व बिडाची जाळी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील स्मशानभूमीतील शेडचे पत्रे आणि बीडाच्या दोन्ही दाहिनी युनिट जाळ्या निकामी झाल्या आहेत. या खराब जाळ्या तात्काळ नवीन बसवून पत्रा शेड ची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. 

गंजलेल्या बिडाच्या दाहिनी

        चंदगड तालुका व परिसरात कालकुंद्रीतील वैकुंठ स्मशान भूमी सर्व सोयींनी युक्त म्हणून प्रसिद्ध आहे. ताम्रपर्णी नदी काठी असलेल्या स्मशानभूमीत दोन शेड, दोन दाहिनी, मृतांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी सिमेंट बाक, सिमेंट काँक्रीट व ब्लॉक बसवलेली प्रशस्त जागा, पाण्याची सुविधा, रात्रीच्या वेळी लाईट व्यवस्था, कॉंक्रीट रस्ता आदी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. तथापि पंचवीस वर्षापूर्वी तसेच दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या अशा दोन्ही शेडचे पत्रे गंजून व वादळामुळे निकामी झाले आहेत. मोठ्या पावसाच्या वेळी बहुतांशी पाणी पेटत्या दाहिनी वर पडते. दोन दाहिनी युनिट पैकी एक पूर्णपणे निकामी तर दुसरेही नादुरूस्त झाले आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी वेळी मोठी कुचंबणा होत आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवसात चौघांचा मृत्यू झाला अशावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याची ग्रामपंचायत, पंस. सदस्य, जिप. सदस्य, आमदार आदी लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन तात्काळ नवीन बिडाच्या जाळ्या बसविण्या बरोबरच  पत्रा शेडची दुरूस्ती करावी. अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment