तेऊरवाडी येथे डांबरी रस्त्यावर दगडांचे साम्राज्य
![]() |
तेऊरवाडी येथे डांबरी रस्त्यावर पावसाच्या पाण्यासोबत वाहत येऊन रस्त्यावर पडलेली दगडे. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्यांच्या देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील नेसरी रोडच्या रस्त्यावर उतारतीला मोठमोठी दगडे येऊन पडतात. दरवर्षी अशी अवस्था होत आहे. पण बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशी व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
येथील गडहिंग्लज तालुका हद्दीपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व पाणी तेऊरवाडी गावापर्यंत येते. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूना मोठी गटारे खोदलेली नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येते. येथे मोठ्या प्रमाणात दगडे पाण्याबरोबर वाहत येऊन रस्त्यावर पडतात. उतार व वळणे असल्याने रस्त्यावरील या दगडांचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. त्यामळे मोठे अपघात होत आहेत. २०१९ च्या पुराच्या वेळी तर या रस्त्यावर दगडांचे ढिगारे पडले होते. पुन्हा अशी दगडे या रस्त्यावर पडली असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने डांबरी रस्त्यावरील ही दगडे त्वरीत हटवून रस्त्याच्या दोन्ही बाजूना गटर खुदाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment