बेळगाव येथील 'मेकॅनिक नागेश ठोंबरे' यांना शिवसंदेश भारत ग्रुप व मित्रपरिवारकडून मदत - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2021

बेळगाव येथील 'मेकॅनिक नागेश ठोंबरे' यांना शिवसंदेश भारत ग्रुप व मित्रपरिवारकडून मदत

मेकॅनिक ठोंबरे यांच्या कुटुंबियांच्याकडे मदत देताना शिवसंदेश भारत ग्रुप व मित्रपरिवार.

कुद्रेमानी : सी. एल. वृत्तसेवा

          महाद्वार रोड बेळगाव येथील प्रसिद्ध मेकॅनिक नागेश ठोंबरे यांचे २४ मे रोजी कोरोनाने निधन झाले. कोरोनाने घरातील कर्ता पुरुष हिरावल्यामुळे कुटुंबाची वाताहत सुरू झाली. हे पाहून शिवसंत संजय मोरे यांच्या आवाहनानुसार बेळगाव येथील शिवसंदेश भारत समूह  व  मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकीतून मदतीसाठी पुढाकार घेत बघता बघता एक लाखाचा मदत निधी जमा केला.

      पत्नी निलिमा ठोंबरे यांच्यावर दिव्या आणि गौतमी या दोन मुलींच्या शिक्षण व संगोपनाची जबाबदारी पडली आहे.  मित्रपरिवाराने घेतलेल्या कै ठोंबरे यांच्या शोकसभेचे प्रास्ताविक संजय मोरे यांनी केले.  यावेळी उद्योजक महादेव चौगुले व राजेंद्र मुतगेकर, ॲड. सुधीर चव्हाण, शिक्षक रणजित चौगुले यांची श्रध्दांजलीपर भाषणे झाली. यावेळी डी. बी. पाटील, ईश्वर लगाडे, एम. वाय. घाडी, गणेश दड्डीकर, सुजित कल्याणराव मोरे, नारायण कणबरकर, हेमंत भोसले, संदीप तरळे, प्रवीण मोरे, एम. के. पाटील, सुभेदार धनंजय मोरे आदींसह शिवसंदेश भारत समूहाचे सदस्य, नागेश ठोंबरे यांचा मित्रपरिवार, हितचिंतक उपस्थित होते. याप्रसंगी दिव्या आणि गौतमी यांच्या नांवे प्रत्येकी २५ हजारांच्या फिक्स्ड डिपॉझिट पावत्या व उर्वरित रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. सूत्रसंचालन सीमाकवी रवी पाटील यांनी केले.

      कै. नागेश ठोंबरे हा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस होता. घरी अठराविश्वे दारिद्र्य असले तरी त्याच्या मनाची श्रीमंती न मोजता येणारे होती. संकटसमयी हाके सरशी धावून येणारा देवमाणूस परोपकाचा वसा आर्ध्यावर टाकून देवाघरी गेला. त्याच्या चिमुकल्या लेकिंना बापाची उणीव भासू नये यासाठी शिवभक्त व समाजातील दानशूर व्यक्तींनी आपल्या ओंजळभर मदतीसाठी ७८२९६३४८१७ या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन शिवसंदेश भारत ग्रुप व मित्र परिवाराने केले आहे.

                                                                                                                                                                                                       बातमी सौजन्य - रवी पाटील, कुद्रेमानी



No comments:

Post a Comment