माडवळे येथे घराची भिंत कोसळली, दोन लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

माडवळे येथे घराची भिंत कोसळली, दोन लाखांचे नुकसान

माडवळे येथे रूक्मिणी महादेव गिरीबुआ यांच्या घराची पडलेली भिंत.

तेऊरवाडी  / सी. एल. वृत्तसेवा

        जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात महापुर आल्याने सर्वच पाणीच पाणी झाले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मागील चार दिवसा पूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे माडवळे (ता. चंदगड) येथील रूक्मिणी महादेव गिरीबुआ यांचे राहत्या घराची भिंत जमिनदोस्त झाली. यामध्ये या घराचे अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या ठिकाणी जिवितहानी झाली नाही. 

       पावसामुळे भिंत कोसळल्याने गिरीबुआ कुटुंब उघड्यावर पडले आहे. यामध्ये संसारोपयोगी साहित्यही भिंतीच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून नुकसान झाले आहे. घरातील टीव्ही, होम थियेटर व अन्य उपयोगी साहित्याचीही हानी झाले आहे. कोरोनाचे संकट आले असतानाच पुरामुळे घरांचीही पडझड झाल्याने नागरीकांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. शासकीय यंत्रणेने या पडझडीचा पंचनामा करुन पिडीतांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. 

No comments:

Post a Comment