पाणी आले धावून अन् शिरोली जवळील मोरीवरील रस्ता गेला वाहून - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

पाणी आले धावून अन् शिरोली जवळील मोरीवरील रस्ता गेला वाहून

शिरोली येथील रस्त्यावर पाण्याच्या वेगाने वाहून गेलेला रस्ता व उघडे पडलेले पाईप

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       अडकूर - कानूर (ता. चंदगड) रस्त्यावर शिरोली नजीक असलेल्या  ओढ्याचे पाणी वेगाने आले धावून अन त्या पाण्याच्या वेगाने मोरीवरील रस्ताच गेला वाहून. त्यामूळे या ठिकाणी तात्काळ दुरूस्ती करणे अत्यंत महत्वाचे आहे.

       या ठिकाणी असलेल्या ओढ्यावर पाईपच्या दोन रांगा करून सहा पाईप टाकण्यात आले आहेत. वरून रस्ता जातो. पण आता झालेल्या जोरदार पावसाने या पाईपवरून जाणारा रस्ताच वाहून गेला आहे. येथे तात्काळ आणखी पाईप  टाकून रस्त्याच्या उंची बरोबरच दोन्ही बाजूना पक्के बांधकाम केल्यास वारंवार या मोरीवर पाणी येऊन बंद पडणारी वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment