विचार, भावना व संवेदना व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम अभिव्यक्ती - प्रा. डाॅ. अनिल गवळी - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

विचार, भावना व संवेदना व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम अभिव्यक्ती - प्रा. डाॅ. अनिल गवळी

प्रा. डाॅ. अनिल गवळी 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       प्रत्येक सजीव आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी विभिन्न माध्यमांचा आधार घेतो. यामध्ये लेखनी, चित्रे, भाषा, रंगसंगती, गायण, वादन, नृत्य, अभिनय इ.चा समावेश होतो. विचार आभासी असतात, भौतिक जगात विचाराना कमी महत्त्व असते. तिथे अनेकवेळा विचाराभिव्यक्तिला दडपण्याचा प्रयत्न होतो. ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा निर्माण होते. असे विचार प्रमुख अतिथी प्रा. डाॅ. अनिल गवळी (हलकर्णी महाविद्यालय)  यानी मांडले. ते र. भा माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे हिंदी विभागाच्या वतीने  आयोजित "अभिव्यक्ती स्वातंत्र्य और भाषा संप्रेषण की प्रासंगिकता" या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते.  

कार्यशाळेत सहभागी झालेले मान्यवर.

            प्रा. डाॅ. अनिल गवळी म्हणाले, ``भारतीय घटनेच्या कलम 19 (1)- अ नुसार प्रत्येक सजीवाना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सरसकट नसावे, त्यामुळे स्वैराचार बोकाळेल, अराजकता माजेल. समाजाकडून याचा गैरवापर होता  कामा नये. याचा स्वैर वापर तथा मानहानी सारखे प्रकार टाळता यावेत यासाठी घटनेमध्येच कांही  बंधने व निर्बंध घालून दिलेआहेत. त्यामूळेच आजवर ज्यानी-ज्यानी अभिव्यक्तिचा गैरवापर केला त्याना शिक्षेला सामोरे जावे लागले. प्रस्थापित, बलवान, धनाढ्य लोक गरीब, निराधार लोकांच्या अभिव्यक्तीची गळचेपी करतात. अशाने समाजाचा लोकशाहीवरील विश्वास उडेल.``

          अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. त्यांनी अभिव्यक्त होने वाईट नाही, पण त्यामुळे अराजकता माजू नये. मनातील भीती दूर करण्यासाठी मुक्तपणे व्यक्त होने गरजेचे आहे, त्यासाठी मनात किंतु न बाळगता व्यक्त व्हायला शिका असा मार्मिक संदेश सर्वांना दिला. 

       कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय हिंदी विभागाध्यक्ष प्रा संजय पाटील यांनी करून दिला. डाॅ. ए. ए. माने, डाॅ. गोरल, प्रा. गडकरी यांनी सहकार्य केले. कार्यशाळेस चंदगड, आजरा व गडहिंग्लज येथील सर्व महाविद्यालयातील प्राद्यापक व  विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डाॅ. आर. ए. कमलाकर यांनी केले तर आभार अग्रणी महाविद्यालय समन्वयक प्रा. एस. एस. सावंत यांनी मानले.



No comments:

Post a Comment