पुराचे पाणी पोल्ट्रीत शिरून 3436 पक्ष्यांचा मृत्यू, सुमारे सहा लाखाचे नुकसान चंदगड तालुक्यातील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

पुराचे पाणी पोल्ट्रीत शिरून 3436 पक्ष्यांचा मृत्यू, सुमारे सहा लाखाचे नुकसान चंदगड तालुक्यातील घटना

पुराचे पाणी पोल्ट्रीत शिरल्याने पिल्ले मयत झाली.

राजेंद्र शिवणगेकर / माणगाव - सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर बुजवडे येथील पोल्ट्री शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सुमारे 3436पक्षी व 69 पोती कोंबडी खाद्याचे नुकसान झाले आहे त्याची किंमत सहा लाखाच्या घरात असल्याने पोल्ट्री व्यवसायिक अडचणीत आले आहेत . सलग तिसऱ्या वर्षी चंदगड तालुक्यातील जनतेला महापुराचा फटका बसला आहे पूर ओसरला असला तरी झालेल्या जखमा भरून निघणे कठीण आहे.

पोल्ट्रीमध्ये पुरामुळे वाहून आलेला मातीचा गाळ साचला आहे.

        चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर व बुजवडे येथे पुराच्या पाण्याचा फटका पोल्ट्री व्यवसायिकांना बसला असून महापुराचे पाणी पोल्ट्रीत शिरल्याने सुमारे एक व दीड किलो वजनाचे तीन हजार 436 इतके पक्षी पाण्यात बुडून मृत्यू झाले असून व पोल्ट्री शेडमध्ये ठेवण्यात आलेले 69 पोती कोंबडी खाद्य पाण्यातून वाहून गेले आहे. या नुकसानीत इब्राहिमपूर येथील राजेंद्र तुकाराम मरगाळे व बुजवडे येथील नारायण सगन धामणेकर या पोल्ट्री व्यावसायिकांचे सुमारे 6 लाख 10 हजार 666 रुपयाचे नुकसान झाले आहे . महापुरामुळे चंदगड तालुक्यातील हे दोन पोल्ट्री व्यावसायिक  अडचणीत आले आहेत पूर ओसरला तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या जखमा भरून निघणे खूप कठीण आहे तरी शासनाने तातडीने या पोल्ट्री व्यवसायिकांना आर्थिक सहकार्य करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.No comments:

Post a Comment