तळगुळी : विजय यांच्या मातोश्री रेणुका यांच्याकडे 25 हजारांचा धनादेश देताना तुकाराम पवार, भरत पाटील, तर उजवीकडे गणपती सुखये, प्रवीण पाटील, गजानन सावंत आदी. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा / एस. एल. तारिहाळकर
मैत्री जपावी तर बेळगावच्या 'गडी आम्ही चंदगडी' या व्हॉट्स ॲप ग्रुपच्या सदस्यांसारखी. या ग्रुपने आपला एक मित्र कोरोना या जागतिक महामारीत गमावल्यानंतर त्याच्या वारसांना मदत म्हणून १ लाख रुपयांची मदत दिली. या ग्रुपने जपलेल्या मैत्रीभावाचे बेळगाव व चंदगड तालुक्यात कौतुक होत आहे.
![]() |
बेळगाव : विजय यांची पत्नी पूजा यांच्याकडे 75 हजार रुपयांचा धनादेश देताना प्रवीण पाटील, परशराम केसरकर, तुकाराम पवार तर उजवीकडे गौरांग भानुशाली, प्रवीण चव्हाण, अभिजीत कोकितकर आदी. |
मुळचे तळगुळी (ता. चंदगड) व सध्या हिंडलगा, श्रीनाथनगर (ता. बेळगाव) येथे वास्तव्यास असणारे विजय हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते. कोरोनाच्या जाळ्यात सापडल्याने विजय सिद्राय कांबळे यांचा ९ मे २०२१ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी पूजा, विराज (वय ३), रिया (वय ५) व त्यांची आई असा परिवार आहे. कर्ता आधारवडच या जगातून सोडून गेल्याने त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून बेळगाव येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारा त्याचा मित्र परिवार मदतीला धावून गेला. विजय यांच्या पत्नीचे माहेर शहापूर, नाथ पै सर्कल (बेळगाव) येथे जाऊन पत्नी पूजा यांच्याकडे 75 हजार रुपयांचा धनादेश या मित्रांनी दिला. तर तळगुळी (ता. चंदगड) येथे राहणारी विजय यांची आई रेणुका कांबळे यांनाही 25 हजार रुपयांचा धनादेश या मित्रांनी दिला. तुकाराम पवार (मांडेदुर्ग) यांनी या ग्रुप मध्ये आर्थिक मदतीसाठी आवाहन केले. याला प्रतिसाद देत गजानन सावंत (कालकुंद्री), प्रवीण पाटील (राजगोळी बुद्रुक), परशराम केसरकर (महीपाळगड), भरत पाटील (कालकुंद्री), राहुल सावंत (हलकर्णी), अभिजीत कोकितकर (नेसरी), ज्ञानेश पाटील (अतिवाड), ज्ञानेश्वर पाटील (अतिवाड), संतोष पाटील (मांडेदुर्ग), बबन भाटे (सुरूते), राहुल मडिवाळ (अथणी), गणपत सुखये (कानुर), विक्रम पाटील (कार्वे), रमेश बसापुरे (तूर्केवाडी), अरविंद पाटील (किटवाड), डॉ. संजय आडाव (कोवाड), रागवेंद्र तकले (जयनगर, बेळगाव) , जीतन पाटील (चलवेन्हट्टी), शांताराम अलगोंडी (चलवेन्हट्टी), डॉ. प्रसाद राजगोळकर (सांबरे), प्रकाश पाटील (शिनोळी), अंकुश पाटील, अमित नाईक (बेळगाव), प्रवीण पाटील (विजयनगर), विनोद साखरे (नेसरी), सदाशिव बापट (बेळगाव), तसेच बेळगाव येथील साईनाथ फार्माचे संचालक अष्टेकर, ज्योतिबा पारसे (माडवळे), सतीश अष्टेकर (बेळगाव), गुंडुराव कांबळे (चिंचणे), प्रदीप चव्हाण (बेळगाव), राजू मोरे (खानापूर), संदीप नाईक (कालकुंद्री) यांच्यासह ग्रुपच्या अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment