घुल्लेवाडी युवकांच्या शोधमोहिमेला यश, वाहून गेलेल्या दुचाकी सापडल्या - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

घुल्लेवाडी युवकांच्या शोधमोहिमेला यश, वाहून गेलेल्या दुचाकी सापडल्या

 

वाहून गेलेल्या दुचाकीसह शोध मोहिमेत सहभागी झालेले युवक.

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
       अतिवृष्टीने चंदगड तालुक्यातील आलेल्या पुरामध्ये घुल्लेवाडी - निटूर या ओढ्यातून तळगूळी येथील महिला सुनीता पांडुरंग कंग्राळकर, सौरभ पांडुरंग कंग्राळकर, यल्लूबाई तुकाराम कंग्राळकर हे दुचाकी वरून जात असताना ओढ्यातून वाहून गेले. मात्र सौरभ व यल्लूबाई याना वाचविण्यात युवकांना यश आले. यातिल सुनीता या वाहून गेल्या. त्यांना वाचविण्यात अपयश आले. मात्र त्यांची दुचाकी व दाटे तालुका चंदगड येथील युवकाची दुचाकीही वाहून गेली होती. मात्र घुल्लेवाडी येथील युवक व ग्रामस्थ यांनी शोध मोहीम राबवून आज मंगळवार दि 27 रोजी या दोन्ही दुचाकी शोधून काढल्या शासनाने याची नोंद  घेऊन सदर मोरीची उंची वाढविण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment