सडेगुडवळे येथे टस्कराचे आगमन, पिकांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

सडेगुडवळे येथे टस्कराचे आगमन, पिकांचे नुकसान

सडेगुडवळे येथे दाखल झालेला टस्कर.

संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          मे महिन्यापर्यंत धुमाकूळ घालून शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणलेल्या  टस्कर हत्तीचे काल पुन्हा चंदगड तालुक्यात आगमन झाले. या टस्कराने काल  सडेगूडवळे येथील शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

        दोडामार्ग तालुक्यातून टस्कराने मार्गक्रमण करत सडेगुुडवळे येथे धमकुळ घातला आहे. येथील प्रभावती प्रकाश शिंदे यांच्या शेतात काल सायंकळी धुमाकूळ घालून भात व ऊस पिकांचे नुकसान केले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पाहणी करून वनपाल भरत निकम, वनपाल दयानंद  पाटील, वनमजूर सानप, होगणे, गावडे यानी घटनास्थळाचे पंचानामे करण्यात आले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत हत्तीच्या मार्गाचा शोध घेतला जात आहे. सध्या टस्कर हत्ती ने हेरे येथील कुडाटेक नावाच्या जंगलात आश्रय घेतला असून सायंकळी सात वाजल्यानंतर टस्कर बाहेर पडून नुकसान करत आहे. टस्कर रात्रीच्या वेळी जंगलातून बाहेर येत असल्याने गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, घराजवळ मिरचीचा धूर करावा तसेच खबरदारी घेण्याच्या सुचना करून हत्ती दिसताच त्याला दगड, काठी  मारून बिथरू नये असे आवाहन  चंदगचे वनक्षेत्रपाल  डी. जी. राक्षे यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment