शिवशाहू प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप, ५०००वही,पेनांचे महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते वाटप,चंदगड-आजरा-गडहिंग्लज येथील युवकांचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2021

शिवशाहू प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप, ५०००वही,पेनांचे महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते वाटप,चंदगड-आजरा-गडहिंग्लज येथील युवकांचा पुढाकार

शिवशाहू प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

मुंबई / खास प्रतिनिधी

            कोरोनाशी दोन हात करताना गेले दीड दोन वर्ष सर्वत्र बंदसदृश्य परस्थिती निर्माण झाली. यातून अगदी शाळा कॉलेजही सुटली नाहीत. अशावेळी मुलांना आलेलं नैराश्य हि गोष्ट विचारात घेऊन गिरणगावात गेली दहा बारा वर्षापासून एकच ध्यास सामाजिक विकास या उक्तीनुसार सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई या संघटनेद्वारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्त साधत विभागातील इयत्ता १ ली ते १० वीत शिकणाऱ्या गिरणगावातील विद्यार्थ्यांसाठी ५००० वह्या, पेन्सिल,व पेन यांचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. 

           सदर छोटेखानी कार्यक्रम महापौर निवासस्थानी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरीताई पेडणेकर,शाखाप्रमुख गोपाळ खाडे व दिपक बागवे यांचे शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित लहान मुलांना शैक्षणिक साहित्य देत पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र देसाई कार्याध्यक्ष राजू येरुडकर खजिनदार विनायक आसबे यांच्यासह बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त संजय चौकेकर, जीवन भोसले, चिटणीस बाळा पवार,  हेमंत मोरे उपस्थित होते.  


             गिरणगावात सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असल्याबद्दल व कोरोनाच्या या  कठीण काळात देखील सवेंदनशीलता जपत देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या शैक्षणिक मदतीबद्दल तसेच वृत्तपत्राची विश्वासार्हता व त्याच्या वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारा वह्यांवरील संदेश व वृत्तपत्र वाचनाने विद्यार्थ्यांना होणारे फायदे या बाबतीत मुंबईच्या महापौरांनी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त संजय चौकेकर व जीवन भोसले यांचे कौतुक करत शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई यांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

        हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजन कोतावडेकर,बिपीन (सनलाईफ),शंकर रिंगे ,सतीश पाटील,बापू कोंदाळकर,संतोष वर्टेकर,संजय कुंभार व शैलेश मगदुम यांचे सहकार्य लाभले शेवटी सर्व मान्यवर व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबलेल्या सर्वांचे आभार प्रतिष्ठानचे सचिव  कृष्णा पाटील यांनी मानले.



No comments:

Post a Comment