![]() |
कुद्रेमानी (ता. जि. बेळगाव) येथे लसीकरणाला नागरीकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. |
कुद्रेमानी / प्रतिनिधी
कुद्रेमानी (ता. जि. बेळगाव) येथील ग्रामपंचायत कुद्रेमानी व प्राथमिक आरोग्य केंद्र उचगांव यांच्या वतीने कोविड १९ रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.आज १८० जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत तीन टप्प्यात ४८० नागरिकांना कोवीशिल्ड लस देण्यात आली.
यावेळी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस युवा कमिटीचे अध्यक्ष म्रणाल हेब्बाळकर यांनी गावातील सर्व नागरिकांनी कोविड19 हा विषाणूजन्य रोग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घेवुन या रोगाला पळवून लावा असे आवाहन केले
याप्रसंगी म्रणाल हेब्बाळकर,ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक पाटील, सदस्य अरुण देवण ,शिवाजी मुरकुटे,आरती लोहार,पीडीओ प्रकाश कुडची,सचिव हणमंत किल्लेकर,दिपक पाटील, वैजू राजगोळकर,गोपाळ चौगुले, रवींद्र पाटील, शंकर पाटील,रुक्माणा कागणकर ,शाहू पाटील ,परिचारिका विजयालक्ष्मी, उल्का जाधव-पाटील, आशा कार्यकर्त्या नंदा पाऊसकर, सुनिता बिजगर्णीकर,नंदा शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment