अडकूर पुलावरून ६० वर्षानंतर पहिल्यांदाच वाहीले पाणी, वाचा काय आहे सद्यस्थिती...... - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2021

अडकूर पुलावरून ६० वर्षानंतर पहिल्यांदाच वाहीले पाणी, वाचा काय आहे सद्यस्थिती......

चंदगड-अडकुर मार्गावरील अडकूर पुल पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेला आहे. 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         गडहिंग्लज - चंदगड या १८९ राज्य मार्गावर असणाऱ्या अडकूर (ता. चंदगड) येथील घटप्रभाना नदिवर असणाऱ्या पुलावरून तब्बल ६० वर्षानंतर प्रथमच पाणी वाहिल्याने या पुराने सर्वच रेकॉर्ड बेक केले आहेत.

       या ठिकाणी पाणी साल्याने सर्व चंदगड व नेसरीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या नदीवर असणारा फाटकवाडी प्रकल्प पूर्ण भरला असल्यान त्याच्या पाण्याचा विसर्ग या नदिपात्रात होत आहे. त्याचा परिणाम म्हणून घटप्रभा नदिवर असणारे गवसे, कानडी, अडकूर, गणूचीवाडी, कानडेवाडी, तारेवाडी हे सर्वच बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज पाऊसाचे प्रमाण कमी झाल्याने पूर ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment