चंदगडच्या पास रेस्क्यु टीमने कोवाड मधील पुरातून पंधरा जणांना काढले सुरक्षित बाहेर, वाचा सविस्तर....... - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2021

चंदगडच्या पास रेस्क्यु टीमने कोवाड मधील पुरातून पंधरा जणांना काढले सुरक्षित बाहेर, वाचा सविस्तर.......

चंदगडच्या पास रेस्क्यु टीमच्या जीगरबाज युवकांनी कोवाडमधील पुरात अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढले. 

कागणी : सी. एल. वृत्तसेवा / एस. एल. तारिहाळकर 

         कोवाड येथे पूरस्थिती गंभीर होत असून 2019 च्या महापूराकडे वाटचाल सुरू होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. शुक्रवारी सकाळी कोवाड येथे पूर पातळी सुमारे चार फुटाने वाढली असून चंदगड येथील पास रेस्कु टीमने येथे ऑपरेशन राबवून पुरातुन १५ जणांना बाहेर काढले.

       पास रेस्क्यू टीमचे प्रमुख श्रीपाद सामंत (चंदगड), किरण येरुळकर (चंदगड), विशाल परब ( चंदगड),  अजय सातार्डेकर (कुर्तनवाडी) युवराज नोकुडकर (किणी), प्रसाद खोराटे (कानडी), रामदास पाटील (कोवाड) यांच्यासह अन्य सदस्य गत दोन दिवसांपासून रेस्क्यू टीम राबवत आहेत. शुक्रवारी कोवाड येथील कीणी बसथांब्यावरील पंधरा जणांना बोटीतून बाहेर काढले. त्यांच्या या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कोवाड येथील कीणी बसथांब्या शेजारील इमारती मधील संदीप बिर्जे यांचे चार सदस्य, गारवा हॉटेलमधील पाच नागरिक, अमोल पाटील यांच्या कुटुंबीयांतील चार सदस्य, रामदास बिर्जे व त्यांच्या पत्नी, अरुण पाटील व त्यांच्या कुटुंबियातील पाच सदस्य, अल्पा टेलर्स मधून एक नागरिक व अन्य असे एकूण १५ जणांना बाहेर काढले.

       २०१९ च्या महापुराची कडे येथील पुराची वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी सकाळपासून दुपारी तीन पर्यंत पूरपातळी  सुमारे पाच फूट वाढली असून कोवाड येथील गणेश मंदिराजवळ १२ फूट उंच इतके महापुराचे पाणी आहे. दरम्यान नागरदळे व निटूर येथून वाहून गेलेल्या दोघांच्या मृतदेहांचा शोध अद्याप लागलेला नाही.
No comments:

Post a Comment