पुरातून वाहून गेलेल्या त्या दोघांचा अद्याप शोध सुरूच, महापुरामुळे शोधमोहिमेत अडथळा - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2021

पुरातून वाहून गेलेल्या त्या दोघांचा अद्याप शोध सुरूच, महापुरामुळे शोधमोहिमेत अडथळा


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       गुरुवारी काल (ता. 22) रोजी ढोलगरवाडी व घुल्लेवाडी (ता. चंदगड) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून एक युवक व एक महिला वाहून गेली होती. आज दिवसभर शोधमोहिम राबविण्यात आली. मात्र मुसळधार पावसामुळे शोधमोहिमेमध्ये अडथळा आला. पुराच्या पाण्याची पातळी दिवसभर वाढत राहिल्याने अद्यापही या दोघांचाही शोध लागू न शकल्याने चिंता वाढली आहे. 

     गुरूवारी सायंकाळच्या सुमारास नागरदळे येथील एअर इंडियामध्ये नोकरीला असलेला युवक अभिषेक संभाजी पाटोल ढोलगरवाडी येथे ओढयाला आलेल्या पाण्यातून वाहून गेला होता. गेले दोन दिवस शोध मोहिम राबवूनही अद्याप तो सापडू शकला नाही. त्यामूळे कुटूंबियांची चिंता वाढली आहे.

        तर घुल्लेवाडी येथे ओढयाला आलेल्या पुराच्या पाण्यातून सुनिता पांडूरंग कंग्राळकर ही तळगुळीची महिला वाहून गेली होती. तीचाही अद्याप शोध न लागल्याने कुंटूंबियासह प्रशासन चिंताग्रस्थ बनले आहे. त्यातच ताम्रपर्णीला महापूर आल्याने शोधमोहिमेत अडथळे निर्माण होत आहे. अधिक तपास पो. हे. काँ. कुशाल शिंदे व अमर सायेकर करत आहेत.No comments:

Post a Comment