तुडये येथे गोवा बनावटीची दारू जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2021

तुडये येथे गोवा बनावटीची दारू जप्त

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        तुडये (ता. चंदगड) येथे घराच्या शौचालयाजवळील शेड मध्थे लपवून ठेवलेली गोवा बनावटीची १४,८९६ रुपयाची दारू चंदगड पोलिसानी जप्त केली.याप्रकरणी उमेश गोविंद आवडण (वय वर्षे - ३३) रा. तुडये (ता. चंदगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     उमेश आवडण याने आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे शौचालयाजवळील पत्र्याच्या शेड मध्थे गोल्डन आईस ब्लू फाईन व्हिस्की या कंपनीची गोवा बनावटीची बेकायदेशीर विक्रीसाठी प्लॅस्टिक पिशवीत लपवून ठेवलेली १४८९६ रूपये किंमतीची १३३ बाॅटल दारू जप्त करण्यात आली. या प्रकणी उमेश गोविंद आवडण याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ए. डी. पाटील करत आहेत.

No comments:

Post a Comment