जि.प पदाधिकाऱ्यांचा चंदगड पंचायत समितीमार्फत सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2021

जि.प पदाधिकाऱ्यांचा चंदगड पंचायत समितीमार्फत सत्कार

कोल्हापूर येथे भेट घेऊन जि.प चे नुतन अध्यक्ष राहुल पाटील यांचा सत्कार करताना चंदगड पं स चे सभापती ॲड अनंत कांबळे,बाजूला जि.प सदस्य अरुण सुतार, संजय चंदगडकर 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड पंचायत समितीचे सभापती ॲड. अनंत कांबळे यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा परिषदचे नुतन अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, अर्थ व शिक्षण सभापती रसिका पाटील, महिला व बाल विकास समितीच्या सभापती शिवानी भोसले यांचा चंदगड पंचायत समितीचे सभापती ॲड अनंत कांबळे,यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जि प सदस्य अरुण सुतार, चंदगड पंचायत समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय चंदगडकर, विठ्ठल पाटील उपस्थित होते.चंदगड तालुक्यातील प्ररलंबि प्रश्नना आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगुन तालुक्यातील विकासकामांंना निधी कमी पडू देणार नसल्यााचे यावेळी अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment