![]() |
| आजरा येथे चंदगड तालुका काँग्रेस कमिटीमार्फत जि. प.चे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचा सत्कार करताना संभाजीराव देसाई . शेजारी जे . के . पाटील , अभिजित शिंपी |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जयवंतराव शिंपी यांचा सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.संभाजीराव देसाई यांनी यावेळी तालुक्यातील विविध प्रश्न मांडले. प्रलंबित प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी उपाध्यक्ष शिंपी यांनी दिली. या वेळी 'टीम सतेज' चे चंदगड तालुका संघटक जे. के. पाटील, अभिषेक शिंपी, उदय देसाई, नामदेव नार्वेकर उपस्थित होते.


No comments:
Post a Comment