चंदगड तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न, विविध अडचणीवर चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2021

चंदगड तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न, विविध अडचणीवर चर्चा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची बैठक पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे संपन्न झाली. या बैठकीत ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी बाबत चर्चा करण्यात आली. 

       यावेळी किमान वेतन मिळणे बाबत, भविष्य निर्वाह निधी रक्कम कोल्हापूर भविष्य निर्वाह निधी कार्यालय मध्ये जमा करावी, सेवा पुस्तक भरावेेत, विमा रक्कम आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली . या मागण्याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.यावेळी आजरा तालुका ग्रा. पं. कर्मचारी अध्यक्ष मोहन कांबळे, चंदगड तालुका अध्यक्ष संजय काबळे, उपाध्यक्ष गावडू पाटील, सचिव संतोष दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आयटक संघटनेचे ग्रामपंचायत कर्मचारी साताप्पा पाटील व त्याचे अन्य पंधरा सहकारी यांनी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन. एस. जी. पी. - ४५११ मध्ये  प्रवेश केला. यावेळी वैजनाथ अडकुरकर, पुंडलिक नाईक, जोतिबा शिंदे, सुभाष गावडे, अनंत कदम, वंजारे, गायकवाड, साळूखे, अजित कांबळे आदीसह कर्मचाऱी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment