पिल्ले अधिवासात फिरताना. |
माणगाव / सी. एल. वृत्तसेवा
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्प शाळेत एक घोणस जातीच्या सर्प मादीने जन्म दिलेल्या तब्बल 30 पिलांना वन विभागाने जंगलात मुळ अधिवासात सोडण्यात आले.
ढोलगरवाडी येथील सर्प शाळेत एक घोणस जातीच्या सर्प मादीने तब्बल 30 पिलांना जन्म दिला. त्यांचे पालन पोषन करणे अशक्य असलेने,त्यांना निसर्गाचे हवाली करणेसाठी प्रा. सदाशिव पाटील यांनी प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांना कल्पना दिल्यानंतर श्री. पाटील हे आपले स्टाफसह सर्पशाळेस भेट देऊन पाहणी करुन सापाविषयी माहिती घेतली.
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्प शाळेत घोणस जातीची पिल्ले वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांचे कडे सुपूर्त करताना सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील. |
त्यानंतर प्रा. पाटील यांनी घोणस पिले वनविभागाचे ताब्यात दिली. ती पुढे दाट जंगलात सोडून दिलेनंतर सुरवातीला रिमझीम पावसात बावरलेली पिल्ले क्षणाधार्तच निसर्ग नियमाप्रमाणे निसर्गाचा भाग होऊन गेली. यावेळी वनपाल बी. आर. भांडकोळी, वनरक्षक दिपक कदम, गणेश बोगरे, वनकर्मचारी विश्वनाथ नार्वेकर व शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. साप जीवन साखळीतील एक महत्वाचा घटक असुन त्यांचे संरक्षण करणेची जबाबदारी सर्वांची आहे. साप वाचवा, शेती वाचवा असे आवाहन प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले. सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील यांचे सर्प संवर्धनाचे काम हे दिप स्तंभासारखे असल्याचे गौरवोद्गार काढले.
No comments:
Post a Comment