कोरोना व महापुराच्या संकटामुळे शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2021

कोरोना व महापुराच्या संकटामुळे शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

हलकर्णी फाटा ता चंदगड येथे शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील व इतर कार्यकर्ते.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माथाडी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस दिवस हलकर्णी फाटा येथे कोरोना व महापूराच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला.

         अजिंक्यतारा येथील सभागृहात माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी केक कापून कार्यकर्त्यांनी शिवाजीराव पाटील यांचे अभिष्टचितंन केले. माजी मंत्री भरमू आण्णा पाटील व शिवाजीराव पाटील यांनी एकमेकांना केक भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार शिवाजीराव पाटील यांनी केला. यावेळी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, माजी सभापती शांताराम पाटील, गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील, मलिक बुरूड, विजय मगदूम, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र बांदिवडेकर, चंदगड नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते दिलीप चंदगडकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेवराव पाटील, दौलतचे माजी संचालक धैर्यशील सावंत -भोसले, कानुरचे तंटामूक्त अध्यक्ष अशोक पाटील, अकूंश गवस, अनिल शिवनगेकर, बाळासाहेब पाटील, परेश पाटील, प्रतापराव सूर्यवंशी, अशोक कदम, सरपंच पंकज तेलंग, लक्ष्मण गावडे, रामभाऊ पारसे आदीसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.No comments:

Post a Comment