कायद्याच्या आधारावर ठाणे अंमलदार चव्हाण यांनी लोकांच्यात माणूसकीच्या जाणीवा निर्माण केल्या - पो. नि. बी. ए. तळेकर, कोवाड येथे चव्हाण यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2021

कायद्याच्या आधारावर ठाणे अंमलदार चव्हाण यांनी लोकांच्यात माणूसकीच्या जाणीवा निर्माण केल्या - पो. नि. बी. ए. तळेकर, कोवाड येथे चव्हाण यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

 

कोवाड (ता. चंदगड) येथील पोलिस चौकीचे ठाणे अंमलदार मानसिंग चव्हाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना पो. नि. बी. ए. तळेकर, जि. प सदस्य कल्लापा भोगण, सरपंच अनिता भोगण  आदी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

  कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडत असताना पोलिसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वेळ, काळ आणि ठिकण निश्चित नसते. कधी कुठे आणि केंव्हा जावे लागेल याचा भरोसा नाही. त्यामुळे त्या पोलिस कर्मचाऱ्यांचे त्याच्या घराकडे दुर्लक्ष होते. चव्हाण यांनी ३८ वर्षाच्या सेवेत अनेक चढ-उतार सोसले. पण आपल्या कामात त्यांनी कधीही कसूर केली नाही, त्यामुळे त्यांचा आज निवृत्तीनिमित्त सन्मान होतो. याचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी केले. कोवाड पोलिस चौकीचे ठाणे अंमलदार मानसिंग चव्हाण यांच्या ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते. 

     प्रारंभी काँस्टेबल कुशाल शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पो. नि. श्री. तळेकर पुढे म्हणाले, ''ठाणे अंमलदार मानसिंग चव्हाण यांनी कोल्हापूर पोलिस दलात प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठपणे काम केले. कायद्याच्या आधारावर त्यांनी लोकांच्यात माणूसकीच्या जाणीवा निर्माण करुन अनेक वादाच्या आणि द्वेषाच्या भिंती दूर  करण्याचा  प्रयत्न केला. कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी सुरु असलेला त्यांचा ३८ वर्षाचा प्रवास पोलीस दलासाठी नक्की प्रेरणादायी ठरेल, अशी आशा व्यक्त केली.''

    यावेळी सत्काराबद्दल चव्हाण यांनी ऋतज्ञता व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्य भोगण, एम. जे. पाटील, सरपंच भोगण, मायाप्पा पाटील, दयानंद कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी सरपंच सौ. अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक भोगण, रेश्मा वांद्रे, दिपक वांद्रे, आप्पा जाधव, शिवाजी पाटील, जयवंत सुरुतकर, अनिल सुरुतकर, पोलिस पाटील काशिनाथ कांबळे, राजेंद्र पाटील, अमृत देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. भैरु भोगण यांनी सुत्रसंचालन केले. काँस्टेबल अमर सायेकर यांनी आभार मानले. 
No comments:

Post a Comment