कोरोना काळातील घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत द्या, कोणी केली हि मागणी...... - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2021

कोरोना काळातील घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत द्या, कोणी केली हि मागणी......

कोरोणा काळातील घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये सवलत द्यावी या मागणीचे निवेदन सरपंचांना देताना ग्रामस्थ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       कोरोना काळातील घरपट्टी व पाणीपट्टी यामध्ये ५० टक्के सवलत द्यावी अशी मागणी पेडणेकरवाडी ग्रामस्थांनी उमगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक व सदस्यांकडे निवेदनातून केली आहे.

        निवेदनात असे म्हटले आहे की, ''गेली दोन वर्ष सन २०१९-२० व २०२०-२१ या सालामध्ये कोरोणाचे संक्रमण असल्यामुळे सर्व कमावती मंडळी कामाविना घरीच बसून आहेत. त्यामध्ये उमगाव ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी यांचे बिले लोकांना माथी दिली आहेत. सध्या तरी हाताला काम नसल्यामुळे ही बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे सन २०१९-२० व २०२०-२१ या काळातील पाणीपट्टी व घरपट्टी या मध्ये ५० टक्के सवलत करून द्यावी. उरलेल्या ५० टक्के रकमेसाठी २ हप्ते करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांना कोरोना काळात थोडासा दिलासा मिळेल. या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य ग्रामसेवक यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.''

     याबाबतचे निवेदन अनिल पेडणेकर, ज्योतिबा पेडणेकर, रघुनाथ पेडणेकर, अनिल जटाळे, प्रकाश पेडणेकर, भरत पेडणेकर यांनी हे निवेदन ग्रामपंचायतीला दिले आहे.



No comments:

Post a Comment