शिक्षकाच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश भेट, शिक्षकाचा अनोखा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2021

शिक्षकाच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश भेट, शिक्षकाचा अनोखा उपक्रम

विठ्ठल नांदुडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश वाटप प्रसंगी श्रीकांत पाटील, पी जे मोहनगेकर, शिक्षक व मान्यवर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         बुक्कीहाळ खुर्द (ता. चंदगड) शाळेचे अध्यापक विठ्ठल नांदुडकर (किणी, ता. चंदगड) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश भेट दिला. नांदुडकर हे गेल्या चार वर्षापासून दरवर्षी हा उपक्रम राबवत आहेत.

         केंद्र शाळा कोवाडचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वाढदिवस व गणवेश भेट कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयप्रकाश विद्यालय किणीचे मुख्याध्यापक पी. जे. मोहनगेकर होते. वाढदिवस अभिष्टचिंतन नंतर मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले. 

           सध्या कोरोनामुळे राज्यातील सर्व शाळा बंद असल्या तरी बुक्कीहाळ शाळा याला अपवाद ठरली आहे. गाव कोरोना मुक्त असल्यामुळे येथील शाळा १५ जून पासून नियमित सुरू असल्याचे सांगून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुंडलिक बिर्जे यांनी मुख्याध्यापक नांदूडकर व अध्यापिका सीमा पाटील यांचे अभिनंदन केले. तर गणवेश वाटपाच्या विद्यार्थीभिमुख उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी श्रीकांत पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापक मोहनगेकर यांना परिवर्तन फाऊंडेशन कोल्हापूरचा राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पालक नामदेव अमरोळकर, कांचन बिर्जे, पार्वती गावडे, कल्याणपूर शाळेचे अध्यापक सिद्धराम पाटील, श्रीकांत आप्पाजी पाटील, प्रभाकर कुंभार आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन मनोहर नाईक यांनी केले. बुक्कीहाळ बुद्रुक शाळेचे अध्यापक संभाजी पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment