म्हाळेवाडी येथे कृषिसंजीवनी अंतर्गत वृक्षारोपण, दोनशे रोपांची लागवड - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2021

म्हाळेवाडी येथे कृषिसंजीवनी अंतर्गत वृक्षारोपण, दोनशे रोपांची लागवड

म्हाळेवाडी येथे कृषी संजिवनी कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपन करताना आमदार राजेश पाटील , कृषी अधिकारी किरण पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृतसेवा

         म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत म्हाळेवाडी आणि कृषि विभाग पं. स. चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिसंजीवनी या उपक्रमांतर्गत आमदार राजेश पाटील व तालुका कृषि अधिकारी  किरण पाटील  यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
        गावा शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात  काजूची व इतर फळझाडे अशा एकूण २०० रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमासाठी सरपंच सी. ए. पाटील, उपसरपंच  विजय मर्णहोळकर, ग्रा. पं. चे सर्व सदस्य, प्रतिष्ठीत ग्रामस्थ विठ्ठल हरी पाटील, एन. आर. पाटील, भरमू  पाटील, रघुनाथ पाटील, गोपाळ दळवी, गुरुनाथ दळवी, तुकाराम कांबळे यांसह गुंडू कोकितकर, सुभाष नांदवडेकर, सचिन पाटील, जगदिश पाटील, निंगाप्पा दळवी, शिवाजी पाटील, सुनिल कांबळे, पी. वाय. पाटील, विठोबा पाटील, ग्रामसेवक चिलमी, म्हाळेवाडी हायस्कूलचे विद्यार्थी, अभिजित कांबळे, तसेच कृषि विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार राजेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. १४ जून रोजी  म्हाळेवाडीतील ग्रामस्थ व तरुण वर्गाने गावाजवळच असलेल्या गोटणी टेक येथे एकूण ५०० झाडांची लागवड ही केलेली आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी ग्रामस्थांनी केलेल्या या वृक्षारोपणचे आमदार   राजेश पाटील  तसेच कृषि अधिकारी किरण पाटील यांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment