![]() |
तुषार देसाई |
![]() |
राजाराम फर्जंद |
दोडामार्ग / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, भारत सरकार नीती आयोग प्रमाणित नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत या संस्थेच्या दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी तुषार तुकाराम देसाई, उपाध्यक्षपदी राजाराम फर्जद यांची तर महिला तालुकाध्यक्षपदी सौ. नेहा ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.
![]() |
सौ. नेहा ठाकूर |
पर्यावरणाचे रक्षण हेच देशाचे संरक्षण हे या संस्थेचे ब्रीद आहे. संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक होऊन यामध्ये दोडामार्ग तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. तुषार देसाई यांनी पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेऊन तसेच नेफडोच्या अंतर्गत पर्यावरणप्रेमी या रण रक्षणाचे निःस्वार्थी, प्रामाणिक कार्य करावे या अपेक्षेने त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment