नांदवडे शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशिप परिक्षेत उज्वल यश, तीन विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2021

नांदवडे शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशिप परिक्षेत उज्वल यश, तीन विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश


ग्रीष्मा गणपतराव गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          केंद्रिय प्राथमिक नांदवडे शाळेने आपल्या स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखत जून 2021 मध्ये घेण्यात आलेल्या  ऑनलाईन Brain Development Scholarship परीक्षेत घवघवीत यश मिळवले. शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील कुमारी ग्रीष्मा गणपतराव गावडे हिने 98% तर कुमारी स्वरा सुनील शिंदे हीने 97% गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले. तसेच शाळेतील कुमार आर्यन शांताराम पाटील याने 89% गुण मिळवत ब्रॉंझ मेडल मिळवले.

स्वरा सुनील शिंदे
         कोरोनाच्या या संकटात यावर्षी ही परीक्षा ऑनलाईन घेणेत आली. परीक्षेचे बदललेले स्वरूप, ऑनलाईन शिक्षणातील अडचणी यावर मात करत शाळेने आपली यशस्वी परंपरा कायम राखली. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका आसावरी बल्लाळ  व मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. 

आर्यन शांताराम पाटील

ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनीही विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत नांदवडे यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.No comments:

Post a Comment