मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा, प्रभाकर खांडेकर फौन्डेशनचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2021

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा, प्रभाकर खांडेकर फौन्डेशनचा उपक्रम

ॲम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ करताना प्रभाकर खांडेकर, बंडु गुडेकर, सौ. वंदना पाटील व इतर मान्यवर.


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. २७ जुलै रोजी सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून या म्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आला. याचा शुभारंभ शिवसेना कोल्हापुर उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते व साई क्लिनिकचे डाॅ. उमेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

          या शुभ लोकार्पण सोहळ्याला शिनोळी परिसरातील उपसरपंच बंडु गुडेकर, ह.भ.प.नारायण पाटील, विनोद पाटील, ग्राम पंचायत सदस्या वंदना पाटील, तानाजी खांडेकर, चेअरमन हनुमान दुध संस्थेचे परशराम मनोळकर, अजित पेट्रोलियमचे अजित खांडेकर, वैभव सेवाचे नारायण पाटील, मोनेश्री चव्हाण, यश काॅमप्युटरचे आनंद जाधव, कृष्णा पाटील, निरंजन ट्रेडर्सचे बाळकृष्ण तरवाळ, शिवाजी पाटील, राहून मेणसे, बाळासाहेब खांडेकर, केतन कार्तिक आदि मान्यवर उपस्थित होते . लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड विधानसभा मतदारसंघात 'सामाजिक बांधिलकी' उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

          वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाकर खांडेकर यांच्या वतीने चंदगड तालुक्यात रुग्णांचे होणारे हाल पाहून सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशी हाय टेक अम्ब्युलन्स चौविस तास लोकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही म्ब्युलन्स प्रभाकर खांडेकर फौंडेशन मार्फत शिनोळी येथे उपलब्ध असणार आहे.

No comments:

Post a Comment