![]() |
अनिल पुंडलिक चव्हाण |
चंदगड तालुक्यातील मुरकुटेवाडी येथील अनिल पुंडलिक चव्हाण (वय २२) या कॉलेज युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. अनिल याने तीन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले होते. तात्काळ त्याला बेळगावच्या के.एल.ई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी (दि. २७ जुलै रोजी) मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.
No comments:
Post a Comment