नेसरी विज वितरण कंपनिच्या कर्मचाऱ्यांनी महापुरातही १२ गावे ठेवली प्रकाशमान - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2021

नेसरी विज वितरण कंपनिच्या कर्मचाऱ्यांनी महापुरातही १२ गावे ठेवली प्रकाशमान

 

पुराच्या पाण्यातून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जाताना कर्मचारी

 एस .के. पाटील -तेऊवाडी प्रतिनिधी
कोवाड- नेसरी परिसरात महापूर म्हटले की अंगावर काटा उभा राहतो . या वेळी तर 
घटप्रभा नदिने पुराचा विक्रम केल्याने परिसरातील अनेक गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता .पन नेसरी विज वितरण कंपनिच्या कर्मचाऱ्यांनी महापुरातही धाडस दाखवत पुरातून पोहत जाऊन विजपुरवठा सुरळीत केला .
     नेसरी गावाजवळून घटप्रभा नदी वाहते . नेसरी उंचावर असल्याने पुराचा  थेट फटका नेसरीला बसत नसला तरी नदिकाठावरून विज वाहीण्या गेल्या आहेत . त्याचे मोठे नुकसान होऊन नेसरी परिसरातील १२गावांचा विजपुरवठा झाला होता . पण 
घटप्रभेला उच्चांकी महापूर आला असल्याने पुरातून पोहत जाऊन विज पुरवठा सुरळीत करण्यामध्ये अडचण होती . पण हे अवाहन नेसरी विज कंपनिच्या पथकाने स्विकारले .
हडलगे नविन पुलाजवळील पुरात असलेल्या विद्युत खांबावर पुरातुन पोहत जाऊन विजपुरठा सुरळीत केला . याचा व्हीडीओ पहाताना अंगावर शहारे येतात . यामध्ये सचिन पाटील , भैरू देसाई , शाम देसाई , प्रशांत देसाई , मैनुद्दीन शेख , प्रकाश पोटे , आशय बागडी , हर्षद सुदर्शने यानी पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन परिसरातील हडलगे , डोणेवाडी , तारेवाडी , नेसरी आदी गावांचा विज पुरवठा सुरळीत केला . या सर्वाना चंदगड लाईव्ह न्यूज व सर्व वाचकांकडून मानाचा मुजरा.



फोटो -

पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन विजपुरवठा सुरळीत करताना नेसरी विज कार्यालयाचा कर्मचारी

No comments:

Post a Comment